Kaleshar Pani | काळेशार पाणी
Kaleshar Pani | काळेशार पाणी
१९७० च्या सुमारास एका पाठोपाठ प्रसिद्ध झालेल्या 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' आणि 'काळेशार पाणी' या दोन लघुकादंबऱ्यांमुळे ह. मो. मराठे हे नाव मराठी साहित्यसृष्टीत एखाद्या चक्रीवादळासारखे घोंघावू लागले. उलटसुलट चर्चा रंगू लागलया. वादविवाद झडू लागले.
आज चाळीस वर्षानंतर या दोन्ही कादंबऱ्यांची साहित्यिक योग्यता निर्विवादपणे मान्य झाली आहे. दोन्ही कादंबऱ्यांच्या साहित्यिक गुणवत्तेची चर्चा करणारे स्वतंत्र समीक्षा ग्रंथही प्रसिद्ध झाले आहेत.
मानवी जीवनातील भूक आणि वासना यांचा भयचाकित करणारा खेळ दाखविणाऱ्या 'काळेशार पाणी' या कादंबरीची ही चौथी आवृत्ती