Kali Aai | काळी आई

Kali Aai | काळी आई
व्यंकटेश माडगूळकर यांच्या या कथासंग्रहात 'काळी आई' या कथेबरोबरच एकूण १४ कथा आहेत. जमिनीलाच आई समजणार्या एका शेतकर्यांची ही कथा मनाला खूप भिडते.या कथेतील अप्पा हे पात्र आपल्या जमिनीवर आईसारखे प्रेम करत असते. जमिनीची सेवा करत आयुष्य घालवलेल्या या वृद्ध गृहस्थाची ही जमीन कुणालाही विकण्याची इच्छा नसते. खूप वय झाले तरी या जमिनीची देखभाल करण्याचा त्याचा निर्धार असतो. अप्पाच्या जमिनीवर त्याच्या नातेवाईकांचा तसेच गावातील अनेक श्रीमंताचा डोळा असतो. जमिनीला आई मानणारे अप्पा आपली ही जमीन विकण्याचा निर्णय एकदा घेतात, पण रात्रभराच्या विचारानंतर जमीन विकण्याचा निर्णय ते बदलतात. ग्रामीण भागातील वातावरण नेमकेपणाने टिपणारी माडगूळकरांची लेखणी आणि जमिनीला आई मानणारा अप्पा वाचकाच्या मनाचा ठाव घेतो.