Kalkallol | कालकल्लोळ

Kalkallol | कालकल्लोळ
कालकल्लोळ हा लेखक अरुण खोपकर यांच्या विविध कला विचारांचा अनुनाद नंतरचा टप्पा आहे. 'विस्तारणारी वर्तृळे' तील लेखात बहुरंगी घटनांचा स्थळांचा व व्यक्तींचा एक पट मांडला आहे यात अनेक नाटक वाले, नर्तक, संतमहंत, विचारवंत आणि विक्षिप्त अशा अनेकांची हृद्य शब्दचित्र आहेत. या लेखनात समकालीन सांस्कृतिक इतिहासाच्या खाणाखुणाही प्रभावीपणे प्रकटलेल्या आहेत. 'तीन किरणकेंद्रे 'तल्या पहिल्या लेखात सतीश आळेकर यांच्या नाटकांकडे ते नवसंकल्पनेच्या आधारे पाहतात. दुसऱ्यात संत तुकाराम या प्रभातच्या कालजयी चित्रपटाची सोदाहरण उकल करतात. तिसऱ्यात ते अरुण कोलटकरांच्या व्यक्तित्वाचा वेध घेतात आणि आतापर्यंत न जाणवलेली काव्य वैशिष्ट्ये नजरेसमोर आणतात. अंतरंगातून खळाळून वाहणारा भाषेचा व समृद्ध विचारांचा प्रवाह या सर्व लेखांना जोडतो. खोपकर हे अनेक कला भाषा व संस्कृतींचे मर्मज्ञ जाणकार आहेत. सहज संवादी भाषा आणि अधून मधून येणाऱ्या अंत:स्फूर्त भाष्या मुळे हे पुस्तक वाचनीय ठरले आहे.