Kalyanche Divas Phulanchya Rati | कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Kalyanche Divas Phulanchya Rati | कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
About The Book
Book Details
Book Reviews
कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती येती नि जाती, येती नि जाती! नवल असे घडते काही स्वप्नात स्वप्न पडते बाई सख्याचा स्पर्श, अनोखा हर्ष प्रीतीच्या सारिका मंजुळ गाती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती! येती नि जाती! वार्याची झुळूक बनतो झुला क्षणांत उंच नेतसे मला सांजेचे रंग, धुंद तरंग पाचही प्राण सुखात न्हाती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती! येती नि जाती! येते ती घटिका सुंदर आहे आनंद हृदयी भरून राहे हिर्वळ ओली पावलांखाली नभीच्या चांदण्या खुडते हाती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती! येती नि जाती! - शान्ता ज. शेळके