Kanyadan |कन्यादान

Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर
Regular price Rs. 110.00
Sale price Rs. 110.00 Regular price Rs. 110.00
Unit price
Kanyadan ( कन्यादान by Vijay Tendulkar ( विजय तेंडुलकर )

Kanyadan |कन्यादान

About The Book
Book Details
Book Reviews

' कन्यादान ' या नावापासूनच कौंटुबिक जिव्हाळ्याचे असावे असा आभास निर्माण करणारे हे नाटक आशयाची मोठी उंची गाठते . आज अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या विषयासंबंधीची एक प्रगल्भ समाजशास्त्रीय जाण या नाटकातून व्यक्त होते . दलित विचारधारणा , समाजवादी विचारधारणा , स्त्री - पुरुष संबंध यासंबंधीचे फार वेगळ्या पातळीवरचे विचार या नाटकाच्या गाभ्याशी आहेत . याविषयीची एक कार्यकर्ते म्हणून असलेली विजय तेंडुलकरांची मते सर्वज्ञात आहेत. आणि तरीही हे नाटक कुठेही प्रचारकी होताना मात्र दिसत नाही . कारण नाटकातील प्रत्येक पात्राचे मानसशास्त्रीय आकलन लेखकाला आहे . नाथ देवळालीकर , सेवा , ज्योती , अरुण , एवढेच नव्हे तर संपूर्ण नाटकात जवळ जवळ नगण्य ठरलेला जयप्रकाश यांचे परस्परांतले संबंध स्वाभाविक वाटतात . त्यांच्या विचार करण्याच्या , वागण्याच्या पद्धतीत लेखकाचा विचार डोकावत नाही . हेच या नाटकाचे फार मोठे यश आहे.

ISBN: 978-8-17-185670-1
Author Name: Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 64
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products