Karachi Te Panchavati | कराची ते पंचवटी
Karachi Te Panchavati | कराची ते पंचवटी
"अरे, नेहरूजी आएं हैं!" एकच हलकल्लोळ उठला. सुंदरीनं बघितलं, नेहरू आपल्या पोरसवदा इंदिरे बरोबर पाहणी साठी आलेले. इंदिरेने पंजाबी सूट घातलेला. तिची चुनरी वाऱ्यावर उडत होती. विचारपूस चाललेली असताना एका माणसाने इंदिरेची चुनरी टोकाशी पकडली. नेहरूंनी ते पाहिलं मात्र व असे भयंकर रागावले! बरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनी चोप दिला. तो म्हणाला, "का? रागावताय ? मी फक्त चुनरी पकडली तर तुम्ही संतप्त झालात. आमच्या आया बहिणींना आमच्यासमोर निर्वस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार केले गेले, गळे कापले इतकं भयंकर! पण तुम्हाला काय त्यांचं, पंडितजी !” सगळे निःशब्द व निरुत्तर झाले. नेहरू कन्येसह लगबगीने तिथून निघून गेले. "देशाच्या फाळणीची झळ आपल्या इथल्या लोकांपर्यंत अजिबात पोहोचली नाही. त्यांच्या दृष्टीने सहसा अपरिचित विषयावर लिहिलं आहेस तू फार संवेदनशील वाचकाला बांधून ठेवेल हे लिखाण. प्रकाशनाला मला आठवणीनं बोलव. मी नक्की येईन....' हे पुस्तक छापले जाण्यापूर्वी त्याचे हस्तलिखित रूप वाचल्यानंतर लेखिकेशी केलेल्या संवादातील प्राध्यापक आणि नाटककार वसंत कानेटकारांचे शेवटचे उद्गार.