Karant - Chintan | कारंत - चिंतन

Karant - Chintan | कारंत - चिंतन
आपल्या विस्तृत जीवनातील कल्पना आणि कृती कधीही निरर्थक भासणार नाहीत. त्या आपलं जीवन उजळून टाकतात. मी जगण्यासाठी कष्ट घेतले आहेत, माझ्याकडून शक्य होतं ते सगळं मी केलं आहे, अशी तृप्ती आपल्या जीवनातून आपल्याला मिळाली पाहिजे. या लेखनातून व्यक्त झालेले अभिप्राय हेच माझं जीवनाविषयीचं अंतिम चिंतन असा निष्कर्ष काढू नये. आजवरच्या माझ्या जीवनातील अनुभवांचं हे सार आहे. पुढील जीवन या अभिप्रायांवर संस्कार करू शकेल, एवढंच काय - बदलही घडवू शकेल. जोपर्यंत जीवन हाच सत्याचा शाश्वत शोध घेण्याचा मार्ग आहे, तोपर्यंत हे अभिप्राय व्यर्थ नाहीत. सत्य' ही विशिष्ट काळाच्या तुलनेनुसार बदलणाच्या जीवनाविषयीची जाणीव आहे .. कन्नड साहित्यिक शिवराम कारंत यांचे विविध विषयांवरील अंतर्मुख करायला लावणारे मुक्त चिंतन.