Karyamagna | कार्यमग्न

Karyamagna | कार्यमग्न
अविनाश पोळ आणि विनायक पाटील हे कार्यकर्तेच आहेत. सामाजिक प्रश्नांना ते भिडलेले आहेत. वेगळा ध्यास घेऊन जगताहेत. यांतल्या बर्याच जणांची सुरुवात दु:खाच्या धक्क्यातून झालेली दिसते. नसीमादीदी स्टेजवरून पडल्या नसत्या तर त्यांचे जीवन चारचौघांसारखे झाले असते. नीलकंठबापूंचा नातू गेला. नीलकंठबापूंचा डॉक्टरच्या बेपर्वाई विरोधातला खटला भारतात पहिला ठरला. विनायकदादांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्याने वेड्या बाभळीतून उत्पन्न काढून दाखविले. श्रमदानाची पूर्वीची जादू संपलीय, हा समज अविनाशच्या मित्रांनी खोटा ठरवला आहे.यांसारख्या 'कार्यमग्न' मंडळींचा लढा, जीवन फक्त त्यांच्यासाठी नाहीय. तो दिसायला व्यक्तिगत लढा असेल. पण त्यात सामाजिकता भरलेली आहे. हे 'कार्यमग्न' मनाचा कल अंतिम मानून फायद्यातोट्याची चिंता न करता चालत राहिले आणि त्यांचे आयुष्य वेगळे झाले. त्यांच्या जगण्याला त्यांच्या पलीकडचा व्यापक असा अर्थ आला. हे कार्यमग्न आपल्याला वेगळी वाट दाखवत आहेत.