Karzankal | कर्झनकाळ

Karzankal | कर्झनकाळ
इतिहासाचे निरीक्षण केल्यास लॉर्ड कर्झनचा भारतातील फक्त पाच वर्षांचा काळ हा भारताच्या भविष्यातील प्रगतीच्या दिशेला वेगळे वळण देणारा ठरला, असे दिसते. याचे कारण लॉर्ड कर्झनचे करारी व्यक्तिमत्त्व, त्याची प्रत्येक विषयाचा सखोल विचार करण्याची अभ्यासू वृत्ती, सैनिकी शिस्त, बाणा, प्रखर बुद्धिमत्ता, स्वामीनिष्ठा आणि त्याचे इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांवरील प्रेम यात दडलेले आहे. कर्झनने प्रत्यक्ष कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी, जगाच्या इतहासाचा आणि भूगोलाचा सखोल अभ्यास स्वत: प्रवास करून केला होता. या प्रत्येक प्रवासाचे डॉक्युमेंटेशन त्याने पुस्तकरूपाने ग्रंथितही केले होते. ब्रिटिश साम्राज्याच्या जागतिक संवर्धनासाठी पुढे ही पुस्तके म्हणजे जणू संहिता (मॅन्युअल्स किंवा कॅटलॉग्ज) ठरली....हे पुस्तक वाचताना हा कर्झनकाळ वाचकाला गुंगवून टाकतो.