Kashmircha Samrat : Lalitaditya | काश्मीरचा सम्राट : ललितादित्य

Kashmircha Samrat : Lalitaditya | काश्मीरचा सम्राट : ललितादित्य
सम्राट अशोकानंतर सर्वात मोठे साम्राज्य उभारणारा ,काळावर मात करणारी भव्य निर्माणकार्ये करणारा,उत्तर हिंदुकुशमधून चीनला जाणा-या आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्गांवर स्वामित्व मिळवणारा,पश्चिमोत्तर भारतातून अरबांना हटवत सुदूर तोखारीस्तान (उत्तर हिंदूकुश) जिंकुन घेणारा,तत्कालीन बलाढय सत्ता विस्तारवादी तिबेटलाही वारंवार हरवणारा,तत्कालीन चीनलाही मुत्सद्दीपणे शह देणारा,आणि कनौजवरुन राज्य करणार्या सम्राट यशोवर्मनला पराजित करत अर्ध्या देशात आपली सत्ता कायम करणारा,पण अलौकीक कार्ये करुनही इतिहासाने कृपणतेने अत्यंत दुर्लक्षित ठेवलेला,आठव्या शतकात होऊन गेलेला काश्मीरचा सम्राट म्हणजे 'ललितादित्य मुक्तापीड' ! ललितादित्याचे संजय सोनवणी यांनी सखोल संशोधन करुन उजेडात आणलेले आणि प्रकाशित झालेले हे जगातील पहिले चरित्र!