Kashmirnama Itihas Ani Vartman | काश्मिरनामा इतिहास आणि वर्तमान

Kashmirnama Itihas Ani Vartman | काश्मिरनामा इतिहास आणि वर्तमान
अशोक कुमार पांड्ये यांचे ‘काश्मीरनामा’ हे पुस्तक वाचून एक सुखद अनुभव येतो. यातील एक एक ऐतिहासिक घटना काट्याकाळजीने, कोणतीही छेडछाड न करता, कोणत्याही पूर्वग्रहापासून मुक्त होऊन लिहिली गेली आहे. मला आशा आहे की, ‘काश्मीरनामा’ ह्या पुस्तकाकडे काश्मीरमध्ये रुची असलेले वाचक, संशोधक, आणि शिक्षक हे इतिहासाच्या पुस्तकातील एक दिशादर्शक पुस्तक म्हणून पाहतील.” - डॉ. निदा नवाज. प्रख्यात काश्मिरी कवी आणि लेखक. "“ काश्मीरचा भूतकाळ आणि वर्तमान या विषयी आपल्या चहूकडे जी शांतता पसरेली आहे ती भंग करण्याचा प्रयत्न हे पथदर्शक पुस्तक करते आहे त्यामुळे त्याचे महत्व कमी समजता येणार नाही. या सारख्या प्रयत्नांमुळे काश्मीर बाबत वृत्तपत्रातून आणि टी.व्ही. माध्यमातून ज्या ब्रेकिंग न्यूज येतात त्या पासून वाचकांना स्वतःचा बचाव करता येईल आणि ही एका संवादाची सुरवात देखील असू शकते. लोक असा विचार करू लागतील की काश्मीर पासून भारताला काय मिळाले आणि भारताने काश्मीरमध्ये काय केले आहे.” - संजय काक प्रसिद्ध चित्रपट निर्माता/ दिग्दर्शक आणि लेखक."