Kavitetun Ganyakade | कवितेतून गाण्याकडे

Kavitetun Ganyakade | कवितेतून गाण्याकडे
कविता काहीच सांगत नाही, सूचित करते. संपूर्ण कविता प्रतिमा होऊन लिहिलेल्या, प्रीतीच्या व दुःखाच्याही कविता मी माझ्या परीने लिहिल्या. मराठी रसिकांनी त्यासाठी मला भरभरून दिलं. अनेक गायक-गायिका, संगीत दिग्दर्शक यांनी त्या कवितेला आणखी वेगळ्या जगात नेऊन ठेवलं. रसिक वर्ग खेड्यापाड्यापासून तर शहरात देश-परदेशात माझा झाला.कविता आणि गीत यात मी कधीच फरक न ठेवता एकसंध लिहिलं. चित्रपट गीतांमध्ये व इतर ध्वनिमुद्रिकांमध्येही मुक्त कविता, लयबद्ध कविता, गाणी आहेत. त्यासंबंधी रसिकांमध्ये कुतूहल असतं. त्याची माझी म्हणून निर्मिती प्रक्रिया पद्धती यांविषयी आणि त्या अनुषंगाने मी लिहावं असा काही रसिकांचा आग्रह म्हणून मी हे लिहिलं, कवितेतून गाण्याकडे.