Kavyaparva | काव्यपर्व

Kavyaparva | काव्यपर्व
या आहेत स्वातंत्र्योत्तर भारतातील निवडक अनुवादित कविता.... स्वातंत्र्योत्तर भारतातील निवडक कवितांच्या अनुवादाचा 'काव्यपर्व' हा संग्रह मराठी साहित्यक्षेत्रातील एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना ठरावी अशा योग्यतेचा आहे. सत्तरीच्या दशकात लिहू लागलेले आणि आता मराठीतील एक नामांकित कवी श्री. निरंजन उजगरे यांनी या संग्रहाचे संपादन केलेले आहे आणि या संग्रहातील सर्व कवितांचा अनुवादही त्यांनीच केलेला आहे. या संग्रहात आसामी, इंग्रजी, उडिया, उर्दू, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगु, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मणिपुरी, मल्याळम, मैथिली, राजस्थानी, संस्कृत, सिंधी आणि हिंदी अशा एकवीस भारतीय भाषांतील निवडक कविता आहेत.