Kay Danger Vara Sutalay! |काय डेंजर वारा सुटलाय!

Kay Danger Vara Sutalay! |काय डेंजर वारा सुटलाय!
सत्यजित नरहरी दाभाडे हे या नाटकातील मुख्य पात्र. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भरडल्या जाणार्या मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसांची आणि त्यांच्या कुटुंबियांची होरपळ हा नाटकाचा विषय. त्यामुळे ही गोष्ट केवळ दाभाडेंची नाही तर त्यांच्यासारख्या असंख्यांची आहे. ही गोष्ट जितकी दाभाडेंची तितकीच त्यांच्या मुलांची, बायकोची, त्यांचं घर बळकावण्याच्या कामगिरीवर आलेल्या घुसखोरांची, त्यातल्या मुन्नाच्या अगतिकतेची आणि दुष्काळी भागातून शहरात आलेल्या बबन येलमामेचीही आहे.विस्थापन आणि स्थलांतर या जागतिकीकरणोत्तर जगाच्या अविभ्याज्य ठरत असलेल्या गोष्टींच्या गाभ्याशी हे नाटक आपल्याला नेऊन ठेवते आणि 'घुसखोरीचाच इतिहास आहे माणसाचा' या प्रखर सत्याने भाजून काढते.