Ke Har Khwahish Pe | के हर ख्वाहिश पे
Ke Har Khwahish Pe | के हर ख्वाहिश पे
तरुण वयात प्रत्येकाच्या मनात भविष्याविषयी अनेक स्वप्नं असतात. बहुतेकांची स्वप्नं वैयक्तिक आयुष्याशी निगडित असतात. काहीजण मात्र त्यापलीकडे जातात. समाजात परिवर्तन घडवून आदर्श मानवी समाज निर्माण करण्याचं स्वप्न ते बघतात. प्रदीर्घ काळ हा ध्यास घेऊन धावत असताना प्रसंगी त्यांची दमछाकही होते. मग जरा थांबून आपल्याच आयुष्याकडे एकदा मागे वळून बघावं; या प्रवासात काय हरवलं, काय गवसलं याचा हिशोब मांडावा असं वाटू लागतं असा हिशोब मांडणार्या हेमंत-वर्षां, शिशिर-ग्रीष्मा आणि शरद-वासंती अशा तीन जोडप्यांचा संसार, कुटुंब आणि त्यांचं काम यांचा धांडोळा घेणारी ही कादंबरी.