Kenjalgadcha Kabja | केंजळगडचा कब्जा

Kenjalgadcha Kabja | केंजळगडचा कब्जा
ह्या किल्ल्याचा पूर्वेतिहास म्हणजे तो किल्ला बाराव्या शतकात पन्हाळ्याच्या भोज याने बांधला. १६४८ मधे आदिलशहाने तो घेतला. त्यानंतर, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपले किल्ले हस्तगत करण्याच्या मोहिमेत हाही किल्ला घेतला... पण तोपर्यंत सव्वीस वर्षे लागली आणि त्यांना १६७४ मध्ये तो घेता आला...त्याच मोहिमेतल्या एकंदर नाट्यावर ह्या कादंबरीचा पाया रचलेला आहे. ह्या गडाजवळून एका खिंडीवजा रस्त्याने रायरेश्वराकडे जाता येते. पूर्व-पश्चिम अशी भौगोलिक रचना असलेल्या ह्या किल्ल्याच्या नैसर्गिक कातळात कोरलेल्या पायऱ्या सुध्दा पाहण्यासारख्या आहेत. तिथल्या 'तळ्या' जवळच्या 'केंजळाई माता' देवीच्या नावावरून घेराकेळंज, केळंजा आणि केंजळ गड अशी त्याला कालमानानुसार नावे पडली आहेत, मात्र छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी तो गड आपल्या कब्जात घेतल्यावर त्या गडाचे नाव 'मनमोहनगड' असे केले आहे. ह्या किल्ल्याच्या कब्जाच्या मसलतीच्या गुप्त बैठका पुण्यातल्या विठ्ठलवाडी मैदानात घडल्या असा त्यात उल्लेख आहे.