Khandyavarche Stars | खांद्यावरचे स्टार्स
Khandyavarche Stars | खांद्यावरचे स्टार्स
जातीय तणाव असलेला परिसर ते नक्षलग्रस्त प्रदेश असे व्यापक कार्यक्षेत्र असणाऱ्या गजानन राजमाने यांच्या कार्यानुभवावर आधारित हे पुस्तक आहे. गुन्हेगार, अन्यायग्रस्त माणसे, आरोपी अशा सगळ्याच माणसांकडे सर्वप्रथम माणूस म्हणून बघणे आणि त्यांना तशी वागणूक देणे याचं भान या पुस्तकातील अनेक थरारक प्रसंगातुन मिळते. त्याकडे पाहण्याची व्यापक आणि निर्मळ दृष्टी मिळते. गुन्हेगार, त्याची मानसिकता, गुन्ह्याभोवती गुंतलेली असंख्य कारणे, त्यामागील मनस्थिती, कौटुंबिक पार्श्र्वभूमी आणि पोलीस अधिकारी म्हणून याकडे पाहताना बाळगलेला मानवीय विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे.
या पुस्तकात २१ लेख आहेत आणि या सर्व लेखांमध्ये एक समान धागा दिसतो, तो म्हणजे कर्तव्य सर्वतोपरी मानण्याची लेखकाची धारणा; पण ते फक्त कर्तव्य करायचे म्हणून नाही तर माणुसकीचा धागाही जपायचा या निर्धाराने…. हे पुस्तक वाचनीय तर आहेच पण त्याबरोबर तरुणांचा उत्साह वाढवणारे आणि प्रेरणादायकही आहे. सर्वसामान्य वाचकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढविणारे हे पुस्तक आहे.
पोलीस सेवेत येऊ इच्छिणाऱ्या असंख्य मुलामुलींना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेलच परंतु पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावताना धर्म-जात यापलीकडे पाहून मानवता या तत्वाला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे ठरते याचा वस्तुपाठ म्हणजे हे लिखाण आहे.