Khel Chalu Rahila Pahije ! | खेळ चालू राहिला पाहिजे !

Khel Chalu Rahila Pahije ! | खेळ चालू राहिला पाहिजे !
सामान्यांच्या असुरक्षित जीवनाचं व्यंगमय दर्शन समस्यांच्या चक्रव्यूहात सामान्य माणूस म्हणजे विदूषकच झाला आहे. मनातून असंतुष्ट,अस्वस्थ, पण तरीही वरकरणी हासत जगणारा! सुट्टीचा वेगळा अर्थ लावणारा, मोबाईल फोन आणि रिमोट कंट्रोलचा गुलाम झालेला, दहशतवादाविरुद्ध हास्यास्पद प्रतिक्रिया देणारा, अति झाल्यामुळं हासावं की रडावं हे न कळणारा असा अगतिक सामान्य माणूस, सरवट्यांच्या ह्या व्यंगचित्र-संग्रहात आपल्याला भेटतो आणि हास्यातून आपली अंतर्यामीची खंत व्यक्त करतो. विनोदाचं जीवनातलं महत्त्व आणि ताकद अधोरेखित करणारा हा संग्रह सर्वांनाच भावेल आणि भिडेल असा आहे. प्रत्येकानं तो संग्रही ठेवणं उचित ठरेल.