Khelghar | खेळघर

Khelghar | खेळघर
आपण अनेक गोष्टी परंपरेने करीत आलेलो असतो; पण प्रवाहाविरुद्ध जाण्याचे धाडस एखादा करतोच. जगात न दिसणाऱ्या; पण त्याचे अस्तित्व आहे, असे मानल्या गेलेल्या गोष्टींना विरोध करीत निसर्गाची जवळीक साधून व अशा ठिकाणी राहून तेथील रहिवाशांसाठी आयुष्य वेचणारा माधव व चकाकनाऱ्या जगात वावरणारी त्याची मुलगी मैत्रेयी यांची कथा. त्यांच्या नात्याची गुंफण रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी 'खेळघर'मध्ये उलगडली आहे. सारंगपाड्याच्या छोट्या वस्तीत वसलेले खेळघर लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणत असते. माधव त्याचा प्रमुख स्तंभ. त्याला आयुष्यात समजून घेऊ न शकलेल्या मैत्रेयीला आपल्या बाबाची ओळख त्यःच्या मागे पत्रांतून कळते. त्यानंतर खेळघर, तेथील माणसे यांच्याशी तिचे नाते खऱ्या अर्थाने जुळते. समाजाचे वास्तव व आभासी चित्र दाखविणारी ही कादंबरी वेगळ्या वाटेवरील आहे.