Khota Sangen ... | खोटं सांगेन...

Khota Sangen ... | खोटं सांगेन...
'वास्तवाचं, सत्याचं बाळ अगदी उघडंवाघडं जगासमोर कधी आणता येत नाही. कल्पिताची अंगडी-टोपडी घालूनच त्याला जगासमोर आणावं लागतं. असं केल्यानं या 'बाळा'चा आपल्याला पाहिजे तेवढाच भाग जगाला दाखवता येतो नि अंगड्या-टोपड्यामुळं त्याचं रुपडं गोजिरवाणंही दिसतं! 'खोटं सांगेन...' (मूळ इंग्लिश शीर्षक - अ पॅक ऑफ लाइज) ही ऊर्मिला देशपांडे यांची कादंबरी अशीच आहे. वास्तव आणि कल्पित यांची बेमालूम सरमिसळ करत कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आत्मकथनाला वाट मोकळी करून दिली आहे. ही 'आत्मकहाणी' म्हणावी इतकी खरी नाही आणि 'कादंबरी' म्हणावी इतकीही कल्पित नाही' अशी सावधगिरी पुस्तकाच्या 'ब्लर्ब'मध्ये बाळगण्यात आली आहे. शिवाय, 'यातल्या 'खर्या-खोट्या'चा निवाडा वाचकांनीच करावा...' अशी 'जबाबदारी'ही वाचकांवर टाकण्यात आली आहे!'