Khujaba | खुजाबा

Sanjay Dhole | संजय ढोले
Regular price Rs. 297.00
Sale price Rs. 297.00 Regular price Rs. 330.00
Unit price
Khujaba ( खुजाबा ) by Sanjay Dhole ( संजय ढोले )

Khujaba | खुजाबा

About The Book
Book Details
Book Reviews

या विज्ञान कथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत आणि प्रत्येक कथा ही स्वतंत्रपणे विज्ञान संकल्पना घेऊन पुढे आलेली आहे. या कथांमध्ये विज्ञान हाच खरा नायक असल्याने, विज्ञानाचा परिसस्पर्श जागोजागी जाणवेल यात शंका नाही. शिवाय, मूळ विज्ञानाच्या वाईटसाईट गोष्टींची उकल झाल्याचे निश्चितच दिसेल. ‘अपहरण’ ही कथा संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाणारी व त्याचा व्याप मांडणारी आहे. तर ‘आगंतुक’ ही कथा अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवाला संजीवनी देणारी व मानवी स्वभावाचे विघातक दर्शन घडवणारी आहे. तसेच, ‘साक्षीदार’ ही कथा मृत व्यक्तीच्या मेंदूतील स्मृती संचयाचे चित्रण करणारी आहे. ‘अज्ञात जीवाणू’ ही कथा जीवाणूंच्या डीएनए व जनुकांचा अभ्यास करताना, परग्रहावरील जीवाणूच्या शोधाचा परिपाक आहे. विविध विज्ञान संकल्पनांतून साकारलेल्या रंजक कथांचा वाचनीय संग्रह.

ISBN: 978-9-39-547781-9
Author Name: Sanjay Dhole | संजय ढोले
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 188
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products