Khundalghas | खुंदळघास

Khundalghas | खुंदळघास
‘खुंदळघास’ हा अस्सल ग्रामीण शब्द.शेतीवाडी करताना वन्यप्राणी, जनावरे यांच्यामुळे होणार्या त्रासाविषयी शेतकरी नेहमीच वापरतात. उन्हातान्हात, पावसापाण्यात खपून पेरलेले शेत तयार होऊन कापणीला येते आणि अचानक अशा पिकांवर वानरे, रानडुकरे, हरणे अशा प्राण्यांचा घाला पडतो. "हातातोंडाशी आलेल्या पिकांत धुडगूस घालून हे प्राणी पिकाचा घास घेतात ते तुडवतात खुंदळतात यावरून ‘खुंदळघास’ हा शब्द प्रचारात आला आहे. एका प्रकृतीच्या आणि वेदनेचे सूत्र असलेल्या या संग्रहातील व्यक्तिरेखांचासुध्दा त्यांच्या वाटयाला येणार्या विपरिततेने अभावग्रस्त प्रतिकूल परिस्थितीने असाच ‘खुंदळघास’ केलेला दिसतो."