Kinare Manache | किनारे मनाचे

Kinare Manache | किनारे मनाचे
मराठी काव्यावर शान्ताबाई शेळके ह्यांच्या काव्याचा विशिष्ट ठसा उमटला आहे, तो काय ह्याचा प्रत्यय यावा असा हा त्यांचा निवडक काव्याचा संग्रह, हे संकलन अशाच प्रतिभावंत कवयित्री प्रभा गणोरकर ह्यांनी केले आहे. ह्या काव्याचे जितके रसाळ तितकेच मार्मिक रसग्रहण. त्यांनी म्हटले आहे ,"शान्ताबाईंची कविता ही त्यांची स्वत:ची कविता आहे. त्यांच्या जगण्यातील सुखदु:खाचे पाठबळ घेऊन ती उभी आहे. आणि तिनेही त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. कवितेच्या इतिहासाच्या संदर्भात बोलायचे झाले तर सौंदर्यवादी, निर्भरशील व्यक्तित्वाचे सर्व विशेष मुखर करणारी ही कविता आहे. स्वत:च्या स्वभावधर्मानुसार ती आपली वाय चोखळत राहिली. तिने आवाज चढवून स्वत:चे अस्तित्त्व प्रकट करण्याचा प्रदान केला नाही. आत्पर, पर आत्मरत नव्हे, लोकप्रिय पण लोकानुरंजन करणारी नव्हे, परंपराप्रिय पण नवाभिमुख, जुनाट नव्हे, अशी सत्त्वशील, प्रसन्न आणि हृदयस्पर्शी, आतील भावबळाने समृद्ध असलेली शान्ताबाईंची कविता अस्तंगत होत चालेलल्या आधुनिक मराठी काव्याच्या परंपरेची शेवटची खूण आहे. शंभराहून अधिक वर्षे, खळाळत वाहत असलेल्या या प्रवाहात शान्ताबाईंनी आपल्या कवितेच्या दिवा सोडून दिला आहे." हा संग्रह अशा काव्याचा आहे !