Krishnasakha | कृष्णसखा

Krishnasakha | कृष्णसखा
भक्ताच देवापाशी दु:ख मागण, तशी प्रार्थना करण हे अर्थपूर्ण आहे; कारण देवापाशी सुखाची प्रार्थना करण म्हणजे स्वार्थ प्रकट होतो आणि सुख मिळू लागल तर माणूस देवाला सोडून सुखामागे धावू लागेल. भक्त जेव्हा दु:ख मागतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, हे देवा, तुझ्याकडून मिळालेल दु:ख हे कुठूनतरी मिळालेल्या सुखापेक्षा जास्त मोठ आहे. असा माणूस देवापासून दूर होण शक्य नाही. कुंतीसुध्दा कृष्णाकडे दु:खाची याचना करते. पदोपदी कृष्णाची आठवण राहावी म्हणून. पण गंमत आहे की देवाकडून मागूनही दु:ख मिळत नाही; कारण देव हा सखा आहे. आणि देव म्हणजे तरी कोण? कृष्ण सांगतात, तू मला शरण ये. यात अहंकार दिसतो का? सामान्य विचार केला तर हो! दिसतो. परंतु इतक्या ठामपणे तीच व्यक्ती अस म्हणू शकते, जिला अहंकार नाही. जी सर्वांची मित्र आहे. सखा आहे. कृष्णाशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीला मोठा प्रतीकार्थ आहे. असायलाही हवा. जो कृष्णापाशी जोडला गेला आहे, तो निर्मूल्य असू शकत नाही. सुदर्शनचक्र हे नावच ते मृत्यूच चक्र आहे आणि त्याला नाव आहे सुदर्शन ! मृत्यूच दर्शन सुंदर कस काय असू शकत? पण आहे. कारण तो सखा त्याच्या हातून मिळणारा मृत्यूसुध्दा सुंदर आहे.