Krushnamrut | कृष्णामृत

Krushnamrut | कृष्णामृत
उपासना कृष्णाचा सर्व आधार उपासनेचा आहे. आणि उपासनेचा आधार स्मरणाचा आहे. कृष्णाची साधना, दृश्य उपासना जे काही नाव आम्हाला द्यावस वाटत असेल ते, त्याच्या मुळाशी कर्मसिधान्त आहे. तुम्हाला मी पणा संपवता आला पाहिजे. कृष्णाचा मार्ग राजमार्ग आहे. अनेकजण जाऊ शकतात; पण खूप कमी लोक जातात; कारण सहजतेचा अभाव आहे. सहजी कृती करावी आणि त्याच फळ परमात्म्यावर सोडून द्याव. कृष्ण सांगतात, अस जो करेल, तो जन्मरूपी बंधनातून मोकळा होईल. सुटका होईल त्याची. ते जन्माला बंधन म्हणत नाहीत. परंतु, आम्ही सर्वसामान्य जीवनाला बंधन समजून जगतो. जन्म मृत्यू म्हणजे बंधन नाही. जन्म मृत्यूबद्दलच अज्ञान जन्म मृत्यूला बंधनाच रूप देत. स्वीकार करा, जे आहे त्याचा,जे काही आहे, जस आहे तसा त्याचा स्वीकार करा. जे होत आहे ते होऊ दे. तू सर्व बघ आणि स्वीकार. तू प्रवाहाविरुध्द लढू नकोस. तू वाहत राहा. तरच तुला स्वर्ग प्राप्त होईल.