Krutadnya Mi Krutartha Mi | कृतज्ञ मी कृतार्थ मी

Krutadnya Mi Krutartha Mi | कृतज्ञ मी कृतार्थ मी
कृतज्ञ मी कृतार्थ मी धनंजय कीर चरित्रकार म्हणून साहित्य जगतात मानाचे स्थान मिळवणारे धनंजय कीर यांचे साहित्यिक कर्तॄत्व अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहे. भारतीय प्रबोधनाला साहाय्यभूत झालेल्या थोर पुरूषांच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाची उकल करणे हे कार्य किती अवघड आहे, याची प्रचीती कीर यांनी लिहिलेल्या या चरित्रग्रंथांमधून येते. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लिहिलेल्या य चरित्रग्रंथातून महाराष्ट्राबरोबरच भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचे दर्शन होते. साहित्यातील मानबिंदू ठरलेल्या चरित्रग्रंथांबरोबरच धनंजय कीर यांचे स्वत:चे आत्मचरित्र ’कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ लोकप्रिय ठरले. धनंजय कीर यांच्या व्यक्तिगत जीवनातील चढ-उतारांची माहिती या आत्मचरित्रातून मिळतेच, परंतु महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातील चरित्रकार कसा घडत गेला याचीही महत्त्वपूर्ण माहिती या ग्रंथातून मिळते. चरित्रसाधने जमविताना त्यांनी केलेल्या धडपडीची, परिश्रमांची जाणीव आपणांस या ग्रंथातून पदोपदी होत असल्याने मराठी वाड्मयाच्या- विशेषत: चरित्रलेखनाच्या अभ्यासकांनी हा ग्रंथ संग्रही बाळगला पाहिजे असेच या ग्रंथाचे स्वरूप आहे.