Kuryat Sada Manjaram | कुर्यात सदा मांजरम्

Kuryat Sada Manjaram | कुर्यात सदा मांजरम्
चाळीतून अपार्टमेंटमध्ये गेलेला आपला मध्यमवर्ग, लिफ्टने वर गेला, तो मनातली चाळ घेऊनच. आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांना खमंग प्रतिक्रियांची फोडणी देत, सुखदुःख साजरी करणारी ह्या कथांमधील इरसाल अर्कचित्रे म्हणजे आपलाच चेहरा दाखवणारा स्वच्छ आरसाच ! विषयांची विविधता नि अगदी ताजे टवटवीत संदर्भ, तर केव्हा सामाजिक विसंगतीवर मार्मिक टपली मारीत केलेले भाष्य, यांमुळे सर्व कथांना वर्तमानाचे परिमाण लाभले आहे. मासलेवाईक घटनांमुळे आपल्याच अपार्टमेंटमध्ये घडल्यात की काय अशा वाटाव्यात अशा ह्या दे धमाल कथा! प्रवीण दवणे यांच्या बहुपैलू लेखणीचा सुखद आविष्कार ! चला, उशीर कशाला ? मुहूर्त समीप आलाय, सनई-चौघडे सज्ज आहेत, सारे मिळून हसतमुखाने म्हणू या, "कुर्यात सदा मांजरम्"