Ladha 'Taklelya' Striyancha | लढा 'टाकलेल्या' स्त्रियांचा

Ladha 'Taklelya' Striyancha | लढा 'टाकलेल्या' स्त्रियांचा
नवर्याने सोडलेल्या बायकांचा प्रश्न आपल्या समाजात खूप जुना आहे. अगदी पुराणकाळापासून सीता, अहिल्या यांसारख्या परित्यक्तांची उदाहरणं आपल्या परिचयाची आहेत. आजही आपल्या समाजात परित्यक्तांसाठी `टाकलेली', `सोडलेली', `बैठीली' असे अत्यंत अपमानकारक शब्द सहजपणे वापरले अॅड. निशा शिवूरकर या हाडाच्या कार्यकर्त्या असून त्यांनी या प्रश्नावर गेली अनेक वर्षं अनेक स्तरांवर झपाटल्यासारखे काम केले आहे. या प्रश्नाची धग जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या लिखाणात व्यापक असा सहानुभाव जाणवतो .सामाजिक भान देणारा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज त्यांनी वाचकांसमोर सादर केला आहे, जो वाचताना वाचक अंतर्मुख होऊन जातो.