Ladhayala Shik | लढायला शिक

Ladhayala Shik | लढायला शिक
माझ्या कवितेत गीतगुण आधी होतेच. नंतर निमित्तानिमितनं मला प्रत्यक्ष गाणीही रचावी लागली. कधी चळवळीसाठी, कधी चित्रपटासाठी, कधी दूरदर्शनसाठी, कधी संस्था-शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांसाठीदेखील. यातली बरीच गाणी आता लोकगीतं झालेली आहेत. लोकांना गाणी माहीत आहेत, पण मी माहीत नाही. याचाही मला आनंदच वाटतो. सामान्य माणसाला प्रतिमा-प्रतीकातून उलगडत जाणारी कविता कळत नाही. पण गाणी म्हटलं, की त्यांना ती लगेच आपलीशी वाटतात. जन्मापासून माझं आयुष्य अशा सामान्य, कष्टकरी लोकांसोबतच गेल्यामुळे आणि आजही माझा खरा रसिक श्रोता तोच असल्यामुळे, त्यांच्यासाठी गाणी लिहिण्याकडे माझा कल आहेच. काही आधीच्या संग्रहात संकलित झालेली, तर काही असंकलित अशी माझी सर्व गाणी सततच्या मागणीमुळे इथं एकत्रित उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. - इंद्रजित भालेराव