Ladhe Ani Tidhe...Chikitsak Gappa Pushpabainshi | लढे आणि तिढे

Ladhe Ani Tidhe...Chikitsak Gappa Pushpabainshi | लढे आणि तिढे
आणीबाणी असो की रमेश किणी, त्या लढण्यासाठी हिमतीने मैदानात उतरल्या. नाटकाच्या सेन्सॉरविरोधात बोलायचं असो की शिवसैनिकांच्या गुंडगिरीविरोधात, त्या आवाज न चढवता, पण ठामपणे बोलत राहिल्या. पदवीचा मराठीचा अभ्यासक्रम पातळ होऊ नये, यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिल्या, तशाच स्त्री अभ्यासाचं पद्धतीशास्त्र मांडत स्त्रियांच्या प्रश्नाला एक सामाजिक आयाम देत राहिल्या...जितक्या आवेशाने त्यांनी लढे दिले, तितक्याच अलवारपणे वेगवेगळ्या संदर्भांतले तिढे सोडवले... आपल्या सगळ्यांना जाणवणारा पुष्पा भावे यांचा हाच ‘युनिकनेस’ वाचकांसमोर यावा, यासाठी हा प्रयत्न. एका मोठ्या काळाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दस्तावेज!