Ladhe Vivekvadache | लढे विवेकवादाचे

Ladhe Vivekvadache | लढे विवेकवादाचे
या पुस्तकातून विश्ववंद्य सॉक्रेटिस, पाश्चात्य राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक प्लेटो, महान ज्ञानी अॅरिस्टॉटल, क्रूर धर्मांधांची बळी हायपेशिया, दूरदर्शी गॅलिलिओ, मानवी स्वातंत्र्याचा मुक्तिदाता व्हॉल्टेअर, पॉल कुर्त्झ, विज्ञानयोगी आयझॅक अॅसिमोव्ह, अवकाश पक्षी कार्ल सेगन, महान विचारवंत बर्ट्रांण्ड रसेल, आधुनिक चार्वाक रिचर्ड डॉकिन्स पासून अब्राहम कोवूर, फुले, आंबेडकर, पेरियार, गोरा, भगत्सिंग, हमीद दलवाई, आ.ह.साळुंखे, तस्लिमा नसरीन ते नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची ओळख होते तसेच चेटकीण प्रथा आणि धर्मयुध्दे, रेनेसॉं काळ, भारतातील धर्मकलह, महाराष्ट्रातील धर्मचिकित्सेची चळवळ यांची माहिती मिळते. इतकेच नव्हे तर यातून विवेकवादाची वाटचाल अधोरेखित होते.