Lalbahadur Shastri : Rajakarnatil Maryadapurushottam | लालबहादुर शास्त्री : राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम

Lalbahadur Shastri : Rajakarnatil Maryadapurushottam | लालबहादुर शास्त्री : राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम
काश्मीरमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाला असताना पं. नेहरूंनी शास्त्रींना तेथे तातडीने पाठविले होते. श्रीनगर येथे गोठवणारी थंडी असल्याने पं. नेहरूंनी स्वत:चा ओव्हरकोट शास्त्रींना दिला. जणू पुढील जबाबदारी शास्त्रींच्या खांद्यावर येणार याचेच ते सूचक होते ! पंतप्रधान म्हणून शास्त्रींनी आपला स्वतंत्र, तेजस्वी ठसा उमटवला. १९६२ च्या चीन युद्धातील मानहानिकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर,१९६५ च्या भारत-पाक युद्धात शास्त्रींनी देशास खंबीर व यशस्वी नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा झळाळून निघाली. ‘जय जवान, जय किसान’ च्या मंत्राने सारा देश भारावून गेला. ताश्कंद शिखर परिषदेत मुत्सद्देगिरीने पावले टाकून त्यांनी अखेर अयुब खानना झुकविले. शास्त्रींनी यशाचे अत्युच्च शिखर गाठले, पण आकस्मिक त्यांचे अवतारकार्य संपुष्टात आले ! ...तीच ही कहाणी तीस वर्षानंतर दप्तरमुक्त झालेल्या अनेक सत्य घटनांच्या साक्षीने लिहिलेली प्रभावी, प्रेरक नि पारदर्शक व आजही भारावून टाकणारी जीवनगाथा!