Laman | लमाण

Laman | लमाण
एका नाट्यधर्मीची जडणघडण 'लमाण' म्हणजे मालवाहू कामगार. वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या 'नटसम्राट' या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील वाक्य आहे : ''आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.'' रंगमंचावरील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लागूंनी हे तथाकथित लमाणाचे काम विलक्षण निष्ठेने, जिद्दीने व सचोटीने केले आहे. ते नुसतेच श्रेष्ठ नट व दिग्दर्शक नाहीत तर पूर्वीपासून लेखकही आहेत. खरे म्हणजे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात एक अनन्यसाधारण स्थान आहे आणि अथपासून इतिपर्यंत अत्यंत ओघवत्या व वाचनीय शैलीत लिहिलेली 'लमाण' ही आत्मकथा हे सिद्ध करते.