Landga | लांडगा

Landga | लांडगा
त्याची आई कुत्री होती. त्याचा जन्म लांडग्यांच्या कळपात झाला. माणसांच्या क्रूर जगात तो लहानाचा मोठा झाला. कुत्र्यांशी त्याचं फक्त शत्रुत्वाचं नातं होतं. माणसांनी नेहमीच त्याला झिडकारलं.खुनी म्हणूनच त्याला सगळे ओळखत होते. तो चोर्या करून जगत होता. तो लांडगा होता का कुत्रा ते कधीच कोणी ठरवू शकलं नाही. तो लांडग्यांपेक्षा हिंस्र होता. माणसांपेक्षा कुटिल होता. तो बुद्धिमान होता. तो योद्धा होता, त्याच्या एकांड्या, अस्थिर आणि रक्तरंजित वाटचालीत तो फक्त एकच गोष्ट शोधत होता, ... प्रेम ! मानवी वाटावी एवढी हळुवार, चिंतनशील तरीही अविस्मरणीय कहाणी.जॅक लंडनच्या 'व्हाईट फॅंग' या सुप्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद.