Lay Bhari : Laththapana : Samasya Va Upachar | लय भारी : लठ्ठपणा : समस्या व उपचार

Lay Bhari : Laththapana : Samasya Va Upachar | लय भारी : लठ्ठपणा : समस्या व उपचार
स्थूलता किंवा लठ्ठपणा ही आता जागतिक समस्या झाली आहे. जगातील कुपोषित लोकांपेक्षा अतिरिक्त लठ्ठ असणाऱ्यांची संख्या आता वाढताना दिसते आहे. हा असंसर्गजन्य रोग असून तो इतर दहा चयापचय क्रियेशी संबंधित आजारांचा जनक आहे. हा आजार बळावण्यापासून जर स्वतःला वाचवायचं असेल आणि भविष्यातील तापदायक सर्जरी व गोळ्या-औषधांचे सततचे डोस यांपासून लांब राहायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच संग्रही असायला हवं. योग्य त्या आहार-विहारातून आपण आपल्या पचनक्रियेला कसं वळण लावू शकतो आणि वजनवाढीला कशा रीतीने आटोक्यात ठेवू शकतो, यांबाबत तपशीलवार माहिती अतिशय रंजकपणे या पुस्तकातून लेखक डॉ. नानासाहेब चौधरी यांनी दिलेली आहे.