Legends |लीजंडस्

Legends |लीजंडस्
दिलीपकुमार, राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद, गुरुदत्त, विजय आनंद, अमिताभ बच्चन या चित्रपटसृष्टीतील महानायकांचा प्रवास अभिजीत देसाई यांनी या पुस्तकात उलगडला आहे. या नायकांच्या बालपणातील ठळक प्रसंगांपासून या प्रवासाला सुरुवात होते. या अभिनेत्यांच्या आयुष्यातील चढ-उतार, सहवासात आलेली माणसे, कौटुंबिक जीवन, नाती, प्रेमसंबंध आदींचा मागोवा या लेखांतून घेतला आहे. त्यांच्या विशिष्ट सवयी, लकबीही त्यातून त्यांतून समजतात. राजकपूर विषयी ते लिहितात, 'पृथ्वीराजचा मुलगा बसलाय एका चटई वर, इतर सहनायकांप्रमाणे घरचा डबा खात.' दिलीपकुमारविषयी म्हणतात, दुसऱ्या दिवशी दुपारपासून दिलीपकुमार प्रेमभंगाचं दु:ख उरात दफन करून कामाला लागला