Lekure Udand Zali |लेकुरे उदंड झाली

Lekure Udand Zali |लेकुरे उदंड झाली
सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांचे हे गाजलेले संगीत नाटक. नाटकाचा विषय, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि श्रीकांत मोघे, कल्पना देशपांडे यांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे हे नाटक रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय ठरले.राजा आणि राणी तांबे या श्रीमंत, निपुत्रिक जोडप्याची ही कथा. तांबे यांना मुले नसल्यामुळे त्यांची सर्व संपत्ती आपल्या मुलांना मिळेल अशी अशा मनात धरून या जोडप्याचे लोभी नातेवाईक त्यांच्या घरी मुक्काम ठोकतात. राणीची बहीण आणि राजाचा भाऊ दोघांच्याही मनात राजाराणीने आपल्या मुलाला दत्तक घ्यावे अशी इच्छा असते. आपला हेतू साध्य होण्याच्या दृष्टीने ते अनुकूल परिस्थिती निर्माण करतात.विनोदी अंगाने जातानाच कारुण्याची झालर असलेले हे नाटक वाचताना किंवा प्रयोग पाहताना आजही मन प्रसन्न करणारे आहे.