Lock Griffin | लॉक ग्रिफिन

Vasant Limaye | वसंत लिमये
Regular price Rs. 450.00
Sale price Rs. 450.00 Regular price Rs. 500.00
Unit price
Lock Griffin ( लॉक ग्रिफिन ) by Vasant Limaye ( वसंत लिमये )

Lock Griffin | लॉक ग्रिफिन

About The Book
Book Details
Book Reviews

ही गोष्ट आहे एका मराठी कुटुंबाची. गोष्ट आहे तीन पिढ्यांची ,ह्याला पार्श्वभूमी आहे गेल्या बासष्ठ वर्षांतील इतिहासाची, संस्कारांची आणि घटनांची. ह्या काळात अनेक सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतरे येऊन गेली. एका साधारण मध्यमवर्गीय घरात घडणारी ही गोष्ट. "नेहमीच्या धडपडीतही सुखानं नांदणारं हे घर. आजूबाजूच्या स्थित्यंतरांचे कधी पुसट तर कधी गडद पडसाद उमटत गेले. जीवनमान बदलत गेलं आर्थिक परिस्थिती सुधारत गेली त्याचबरोबर आजूबाजूचा गोंधळ अस्थिरता आणि अस्वस्थता वाढतच गेली. येणार्‍या वादळातही शिक्षण संस्कार मूल्यं यांची ओंजळ जपत इतर अनेकांसारखं हे घरही उभं होतं." "आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सत्ताकरणाची गुंतागुंतीची समीकरणं अनाकलनीय असली तरी भयप्रद आहेत. एक अस्वस्थ खळबळ आहे सारं काही हरवत चालल्याची भिती वाटते. जगभर उद्रेकाचे पडघम वाजायला लागले आहेत. एकीकडे क्रयशक्तीची भरमसाठ वाढ आहे तर दुसरीकडे मंदीचा भस्मासूर वाकुल्या दाखवतो आहे. वादळात सापडलेल्या गलबताला दिशाहीनतेचं सावट ग्रासून टाकत आहे." "१९२४ साली रत्नागिरीजवळच्या छोट्या गावात जन्माला आलेले विश्वनाथ मोरेश्वर हे पहिल्या पिढीतले त्यांची दोन मुलं मोठा रघुनाथ बँकेत नोकरीला तर धाकटा धनंजय सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि एनक्रिप्शन क्षेत्रातील तज्ज्ञ. रघुनाथचा एकुलता एक मुलगा सौभद्र आणि त्याची अमेरिकन मैत्रिण ज्युलिया ही तिसरी पिढी. ६२ वर्षांचा कालखंड अमेरिका ब्रिटन दिल्ली डोंबिवली असा विस्तृत रंगमंच. एका उत्कंठावर्धक जिगसॉचे तुकडे जुळवत चित्र उभं करणारी ही कहाणी. सामान्य माणसांच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं. हे नाट्य उलगडून दाखवणारी ही गोष्ट."

ISBN: 978-9-38-009227-0
Author Name: Vasant Limaye | वसंत लिमये
Publisher: Granthali Prakashan | ग्रंथाली प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 468
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products