Lokmanya Te Mahtama |Part -1 & 2) | लोकमान्य ते महात्मा |खंड - १ आणि २)
Lokmanya Te Mahtama |Part -1 & 2) | लोकमान्य ते महात्मा |खंड - १ आणि २)
‘लोकमान्य ते महात्मा’ (खंड - १ आणि २) हा समग्रलक्षी महाग्रंथ म्हणजे सर्वंकष सांस्कृतिक महाचर्चा असून तिला पुराव्यांची भक्कम चौकट लाभली आहे. महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाची लखलखीत सप्रमाण मीमांसा करताना डॉ. सदानंद मोरे यांनी गुंतागुंतीच्या आंतरप्रवाहांची उकल व त्यांचा अनुबंध यांचा सूक्ष्म वेध घेतला आहे. मानवी जीवनाप्रमाणेच बहुमिती असणा-या इतिहासाचे सर्वांगीण दर्शन घडवणा-या या विशाल ग्रंथाचा आवाका थक्क करून सोडणारा आहे. या ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतला आहे.