Lokmanya Tilak : Bharatiya Swatantryasangramache Janak | लोकमान्य टिळक : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक

Lokmanya Tilak : Bharatiya Swatantryasangramache Janak | लोकमान्य टिळक : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक
लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक होते. या चरित्र ग्रंथात टिळकांच्या सामाजिक दृष्टिकोनाच्या पैलूचा वास्तवदर्शी विचार केला आहे. टिळकांचे चारित्र्य, विचार आणि व्यक्तिमत्त्व या विषयी हा ग्रंथ अनेक नवे मुद्दे, सत्ये आणि ताजे संदर्भ वाचकांपुढे आणत त्या पुरुषाचे वास्तव चित्र वाचकांच्या नजरेसमोर उभे करतो. स्वराज्य परत मिळवणे हा एकमेव उद्दिष्ट असलेल्या टिळकांनी साधना पेक्षा ध्येयपूर्ती ला महत्त्व दिले. या पुस्तकात टिळकांच्या राजकारण, पत्रकारिता, तत्त्वज्ञान आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा अशा विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या योगदानाचा परामर्श घेतला आहे.