Lokpalachi Mohini | लोकपालाची मोहिनी

Lokpalachi Mohini | लोकपालाची मोहिनी
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन उभारले आहे. काही अंशी त्याला यशही आले आहे; मात्र अर्ध्याहून अधिक लोकांच्या मनात अजूनही शंका आहे, की यामुळे भ्रष्टाचार कमी होईल का? त्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचाराची पाळेमुळे गेली अनेक दशके आपल्या देशात रूजली आहेत. ती उपटून काढणे सहजी शक्य नाही. या आंदोलनामुळे लोकांमध्ये जागरूकता झाली. आता त्याचा कितपत फायदा होईल, याबाबतचे परखड विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. प्रशासकीय सेवेत काम केलेल्या माधव गोडबोले यांच्यासारख्या सनदी अधिकार्याने लोकपाल विधेयक आणि भ्रष्टाचार यांच्या सर्व बाजूंचा विचार करून हे पुस्तक लिहिले आहे. वाचकांच्या अनेक प्रश्नांना यातून उत्तरे मिळू शकतात.