Lokpriy Marathi Chitratare |लोकप्रिय मराठी चित्रतारे

Lokpriy Marathi Chitratare |लोकप्रिय मराठी चित्रतारे
चित्रपट कलावंताविषयी सामान्यांना कुतूहल असते. त्यांचे खासगी जीवनातील प्रत्येक बाब सार्वजनिक होत असते. असा काही चित्रताऱ्यांच्या तोही मराठी कलावंतांचा जीवनपट 'लोकप्रिय मराठी चित्रतारे'मधून डॉ. शुभा चिटणीस यांनी रसिकांसमोर मांडला आहे. "शुटींग व्यतिरिक्त प्रत्यक्ष आयुष्यात हे कलाकार कसे आहेत त्यांचे छंद भूमिका साकार करण्याची त्यांची हातोटी त्यासाठी ते घेत असलेली अपार मेहनत असे पैलू यात आहेत." "चिमणराव ते महात्मा गांधी हा दिलीप प्रभावळकर यांचा प्रवास हँडसम अँड ब्युटीफुल सुबोध भावे मराठी रंगभूमी चित्रसृष्टीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे मोहन जोशी भूमिकेत प्राण ओतणारे अविनाश नारकर अभिनयात जन आणणारे व रोखठोक स्वभावाचे शरद पोंक्षे मराठवाड्यातून मुंबईच्या मायानगरीत अभिनयाच्या जोरावर स्थिरावलेले मकरंद अनासपुरे समर्थ अभिनयाचे जगणारे किशोर कदम मुरब्बी कलाकार सुनील बर्वे तसेच उमेश कामत अनिकेत विश्वासराव अमोल बावडेकर संतोष जुवेकर अंगद म्हसकर विघ्नेश जोशी संग्राम समेळ आदी नायकांची ओळख यात करून दिली आहे." कलाकारातील माणूसपण टिपताना त्यांच्या कुटुंबस्वास्थाचेही महत्त्व सांगितले आहे.