Lokshashi Ani Hukumshashi | लोकशाही आणि हुकुमशाही

Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Lokshashi Ani Hukumshashi ( लोकशाही आणि हुकुमशाही ) by Narendra Chapalgavkar ( नरेन्द्र चपळगावकर )

Lokshashi Ani Hukumshashi | लोकशाही आणि हुकुमशाही

About The Book
Book Details
Book Reviews

आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर्‍याच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्‍या विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार्‍यांना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते.

ISBN: 978-9-39-548393-3
Author Name: Narendra Chapalgavkar | नरेन्द्र चपळगावकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 172
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products