Lokvandmayshastra | लोकवाङ्मयशास्त्र

Lokvandmayshastra | लोकवाङ्मयशास्त्र
मराठीतील लोकवाङ्मय हा एक संपन्न आविष्कार आहे. पोवाडे, अभंग, ओव्या, कीर्तन, भजन आदी कलांमध्ये उभा महाराष्ट्र रंगून जातो. संस्कार, प्रबोधन आणि मनोरंजन या तिन्ही निकषांवर या कलांची ताकद अफाट आहे. विशेष म्हणजे हे सर्व लोककला प्रकार मौखिक परंपरेने चालत आले आहेत. स्वाभाविकच त्याविषयी लिखित स्वरुपात फारशी माहिती उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर या लोकवाङ्मयाचा एक शास्त्र म्हणून अभ्यास ही खूपच पुढची गोष्ट झाली. परंतु लोकवाङ्मयाचे एक गाढे अभ्यासक डॉ. गंगाधर मोरजे यांनी उतारवयातही जिद्दीने आणि निष्ठेने हे पुस्तक सिद्ध केले आहे. लोककलांच्या अभ्यासाचे दालन किलकिले करणार्यांमध्ये मोरजे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ते तसे का घ्यावे लागते हे पुस्तक वाचल्यानंतर ध्यानी येऊ शकेल इतकी माहिती आणि लोककलांची, लोकवाङ्मयाची चिकित्सा या पुस्तकात त्यांनी केली आहे.