Lords Of The Deccan | लॉर्डस ऑफ द डेक्कन

Lords Of The Deccan | लॉर्डस ऑफ द डेक्कन
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून गेल्याचं दिसतं मात्र उर्वरित उपखंडाचा इतिहास हा अत्यल्प प्रमाणात आणि सहसा फक्त तळटीपांच्या स्वरूपात दिला जातो. कनिसेट्टी यांच्या या विद्वत्तापूर्ण आणि निःपक्षपातीपणे लिहिल्या गेलेल्या पहिल्याच पुस्तकाचं गंभीरपणे स्वागत झालं आहे. या पुस्तकात अनिरुद्ध कनसेट्टी यांनी अंधारावर प्रकाशझोत टाकला आहे आणि मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीच्या म्हणजे सहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंतच्या काळातील दख्खनला, त्याच्या सगळ्या ऐश्वर्यासह आणि निखळ कीर्तीसह चोखंदळ वाचकांसमोर जिवंत केलं आहे.