M. T. Ayva Maru | एम. टी. आयवा मारू

M. T. Ayva Maru | एम. टी. आयवा मारू
एम टी - मोटर टॅंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक; 'मारू' म्हणजे जहाज; 'आयवा मारू' या जपानी शब्दाचा अर्थ - प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज.'एम टी आयवा मारू' चे कथानक हॉंगकॉंगच्या किनार्यावर सुरू होते. चीनच्या किनार्यावर वेग घेते; फिलिपीन्सच्या किनार्यावर रंगू लागते ... "'एम टी आयवा मारू' हा प्रेम-द्वेष मत्सर-घृणा या भावभावनांचा जिवंत झंझावात आहे. पंचमहाभूतांचे जीवघेणे वादळ आहे. ही कादंबरी वाचताना एकच विचार सतत मनात येत राहील: ही काल्पनिक कादंबरी आहे की सत्य घटनांचे विवेचन आहे?ही कादंबरी वाचताना जर सागराने आभाळात भिरकावलेली 'आयवा मारू' तुम्हाला स्वत:ला दिसली असेल जर लाटांचे तांडव तुम्ही स्वत: अनुभवले असेल जर वार्याचे घोंघावणे तुम्हाला स्वत: ला ऐकू आले असेल जर 'आयवा मारू'ने तुम्हालाही झपाटले असेल तर ही 'आयवा मारू' काल्पनिक असणे शक्य आहे का?"