Madhyasamrat Subhaschandra Goyal | माध्यसम्राट सुभाषचंद्र गोयल

Madhyasamrat Subhaschandra Goyal | माध्यसम्राट सुभाषचंद्र गोयल
हरियाणातील लहानशा गावातला एक मुलगा भारतातील पहिल्या 18 श्रीमंतांत केवळ पाच दशकांत भरारी मारतो हे अविश्वसनीय सत्य प्रत्यक्षात उतरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्रा. त्यांना ‘भारतातील मीडिया सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. 17 व्या वर्षी खिशात फक्त 17 रुपये असताना, शिक्षण अर्धवट सोडून, वडिलांच्या तोट्यात गेलेल्या व्यवसायाला पुनश्च: उभे करण्याची जिद्द बाळगत त्यांनी आपल्या उद्योजकीय कामगिरीचा श्रीगणेशा केला. अवघ्या काही वर्षांत त्यांनी व्यवसाय केवळ नफयातच आणला नाही तर, पुढच्या एका दशकात त्यांनी आपल्या व्यवसायाला 100 कोटी रुपयांच्या व्यवसायात बदलले आणि आज एस्सेल ठूप या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या तसेच केवळ भारतभरच नव्हे तर जगभर विस्तार असलेल्या विशाल उद्योगसमूहात त्याचे रूपांतर केले. "एखाद्याला अडथळा वाटणारी कोणतीही संधी त्यांनी बाजूला सारली नाही तर तिचा समर्पक उपयोग करून घेतला. मग ती वडिलांच्या व्यवसायातील तोटयाची परिस्थिती असो अर्धवट सोडून द्यावे लागलेले शिक्षण असो वा पुढे उद्योगात आलेल्या अनेक आव्हानात्मक अडचणी असोत त्यांनी सातत्याने उद्योगवृद्धीचाच ध्यास घेतला आणि याच ध्यासातून त्यांनी विविध क्षेत्रांत उच्चपातळी गाठलेले 20 हून अधिक उद्योग उभे केले ज्यांनी आज जगभर नावलौकिक मिळवला आहे" डॉ. सुधीर रािर्िंशगकर ज्येष्ठ उद्योजक आणि सुप्रसिद्ध लेखक सुधीर सेवेकर हे उच्चविद्याविभूषित असून त्यांना औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्यानुभव आहे. गेली 40 वर्षे ते विविध माध्यमांतून लेखन करीत असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विशेषत: उद्योजकीय चरित्रलेखन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. रंगभूमीशीही त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. जगाच्या विविध भागांत गेली अनेक वर्षे त्यांनी नोकरी आणि पर्यटनाच्या निमित्ताने विस्तृत भ्रमण केले आहे.