Mahabhartache Vastav Darshan | महाभारताचे वास्तव दर्शन

Mahabhartache Vastav Darshan | महाभारताचे वास्तव दर्शन
आदिपर्वाच्या अध्याय १२० मधील श्लोकात भारत आणि महाभारत या शब्दांचे स्पष्टीकरण आले आहे. उपाख्याने वगळून जो कौरव पांडवांचा इतिहास उरतो, तो २४ सहस्र श्लोकांचा आहे आणि उपाख्यानांसहित १ लक्ष श्लोकांची संहिता गृहित धरली जाते. तिला महाभारत म्हणतात.-- प्राचार्य अनंत दामोदर आठवले उर्फ स्वामी वरदानंदभारती. "संस्कृतीवर अशोभनीय आरोप करणे समाजाच्या श्रद्धास्थानांची टिंगल करणे प्राचीन ग्रंथाची अवहेलना करणे यामध्येच विद्वानांना भूषण वाटू लागले. याचा प्राचार्यांना मनस्वी त्रास झाला. परिणामत: त्यांच्या प्रतिकार करण्यासाठी प्राचार्यांनी व्याख्याने दिली. महाभारताचे वास्तव दर्शन हा ग्रंथ त्याचीच फलश्रुती होय." महाभारतातील थोर व्यक्तिरेखांचे चरित्रहनन करणार्या आक्षेपांच्या संदर्भात खंडनात्मकरीत्या महाभारतातील घटनांचे वास्तव दर्शन घडविणारा ग्रंथ.