Mahadji Shinde | महादजी शिंदे

Mahadji Shinde | महादजी शिंदे
राजस्थानातून उगम पावून बंगालच्या उपसागरात विलिन होणाऱ्या 'चंबळ' ह्या प्रमुख नदीची उपनदी. म्हणजे 'क्षिप्रा' नदी. ती मध्यप्रदेशातून दक्षिण पूर्वदिशेने वाहाते. तिच्या काठी उज्जयिनी हे शहर वसले आहे. तिच्याच काठावर महाकालेश्वर मंदिर आहे. अशा ह्या तीर्थक्षेत्रीय महत्त्वाच्या शहरातच आणि क्षिप्रानदीच्या कुशीतच, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे मानकरी राणोजी शिंदे यांचे चिरंजीव म्हणजे 'महादजी शिंदे' उदयास आले. "आपल्या अंगच्या गुणांनी पेशवे दरबारीचे सरदार आणि खिताबमानकरी असणारे महादजी शिंदे ह्यांनी अनेक लढाया एका बाजूला गाजविल्या पण दुसऱ्या बाजूला शांत फावल्या वेळात मनापासून 'श्रीहरी' अर्थात 'श्रीकृष्ण' ह्या विभुतीवर स्वरचित कवनगायन हाती स्वतःच टाळ चिपळ्या घेऊन केले आहे."