Mahanirvan |महानिर्वाण

Mahanirvan |महानिर्वाण
मराठी रंगभूमीवरील ‘माइलस्टोन’ समजल्या जाणाऱ्या काही नाटकांपैकी एक, ज्या नाटकाने रंगभूमीला नवा आयाम मिळवून दिला, रूढी-परंपरांचे आणि मानसिकतेचे भारतातील विविध भाषांतून दर्शन घडविले असे ‘महानिर्वाण’. सुतकाचं कीर्तन आणि मृत्यू या विषयांभोवती रचलेले, अतिशय प्रभावी लेखन असलेले ‘महानिर्वाण’ हे नाटक अशा एका मृत व्यक्तीची कथा सांगते, ज्याला एका विशिष्ट प्रकारेच स्वतःचे अंत्यसंस्कार व्हावे असे वाटते. त्याप्रकारे अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याचे पार्थिव तसेच ठेवले जाते.त्यानंतरच्या अनेक घडामोडींतून हे नाटक पुढे जाते आणि समाजातील मानसिकतेचे दर्शन घडवते. आशय, भाषा, रचना या दृष्टीने हे नाटक अर्थपूर्ण आहे.